Heading 3
Heading 2
महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदावरून सगळ्याच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे.
अनेकवेळा नेत्यांपेक्षा त्यांचे कार्यकर्तेच जास्त उत्साही दिसत आहेत.
प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आपल्या नेत्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावत आहेत.
काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांनी 2024 नाही तर आताच मुख्यमंत्रीपदावर दावा असल्याचं सांगितलं.
यानंतर नागपूरमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले.
मुंबईतही दादा मुख्यमंत्री झाले तर? असे पोस्टर लावण्यात आले.
नागपूरमध्येच भाजप कार्यकर्त्याकडून भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लिहिलेली पोस्टर झळकली.
पोस्टर लागल्यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून कानउघाडणी करण्यात आली. यानंतर ही पोस्टर हटवण्यात आली.
याआधी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेरही अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री करत पोस्टरबाजी झाली.
अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरच सुप्रिया सुळेंच्या नावानेही पोस्टर लागली.
जयंत पाटील यांच्या नावाची पोस्टरही मुंबईमध्ये लावण्यात आली होती.
उद्धव ठाकरेही वारंवार पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, असं सांगतात.
कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बोलून दाखवली आहे.