अजितदादा आतापर्यंत किती वेळा नाराज झाले?

Heading 3

Heading 2

अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपसोबत जातील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. 

अजित पवारांनी मात्र या बातम्या फेटाळून लावत, माध्यमांवरच खापर फोडलं.

अजितदादा नाराज व्हायच्या बातम्या यायची ही काही पहिलीच वेळ नाही.

2004 निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळल्या.

तरीही पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं, तेव्हाही अजितदादा नाराज झाल्याचं बोललं गेलं.

2009 निवडणुकीनंतर शिवसेनेने अजितदादांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. 

तेव्हाही अजितदादा वेगळा विचार करतील का? अशी कुजबूज झाली.

2012 साली सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजितदादांनी नाराज होत तडकाफडकी राजीनामा दिला.

7 डिसेंबरला अजित पवार मंत्रिमंडळात आले, पण 26 डिसेंबरला त्यांना अर्थ आणि उर्जा खातं देण्यात आलं.

तेव्हा 19 दिवस अजितदादा बिनखात्याचे मंत्री होते.

2019 ला शरद पवार ईडी कार्यालयात गेले. तेव्हा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली

अजित पवार मात्र तेव्हा गायब होते, यानंतर संध्याकाळी अचानक त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

2019 ला तर अजितदादांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

2019 लोकसभा निवडणुकीत पूत्र पार्थ पवार यांचा पराभव झाल्यानंतरही अजितदादा नाराज झाले. 

सुशांतसिंह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवारांनी केली होती.

माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. ते इमॅच्युअर आहेत, असं शरद पवार म्हणाले होते. 

शरद पवारांनी थेट मीडियासमोरच पार्थवर टीका केल्यामुळेही अजित पवार नाराज झाल्याचं बोललं गेलं.