शिवसेना पक्षाच्या चिन्हांचा इतिहास..
ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांनी पक्षावर दावा केल्याने निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे.
एखाद्या पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाहीय.
याआधी काँग्रेस आणि भाजपलासुद्धा या प्रक्रियेतून जावं लागलं आहे.
1989 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले.
गेली 33 वर्षे धनुष्यबाण हा शिवसेनेची ओळख आहे.
त्याआधी म्हणजे 1968 मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती.
1980 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते.
तर 1985च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, सूर्य, बॅट बॉल अशी वेगळी चिन्हे मिळाली होती.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर ढाल तलवार, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य, मशाल अशा चिन्हांचा वापर झाला होता.
आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा धगधगती मशाल निवडली आहे.