या 16 आमदारांवर टांगती तलवार!

Heading 3

Heading 2

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच येणार आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार, यावर पुढचं राजकारण अवलंबून आहे.

हे 16 आमदार कोण आहेत, त्यावर नजर टाकूया.

अपात्रतेच्या नोटीसमध्ये सगळ्यात पहिलं नाव एकनाथ शिंदे यांचं आहे.

सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी अब्दुल सत्तार होते, त्यामुळे त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली.

तानाजी सावंत यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.

यामिनी जाधव यांनाही अपात्रतेची नोटीस देण्यात आली.

संदिपान भुमरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरूवातीलाच सुरतला जाणारे आमदार होते.

भरत गोगावले यांनाही एकनाथ शिंदेंसोबत गेल्यामुळे नोटीस मिळाली आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांपैकी एक असलेल्या संजय शिरसाट देखील एकनाथ शिंदेंसोबत गेले.

लता सोनावणे यादेखील शिवसेना आमदारांसोबत गुवाहाटीला गेल्या होत्या.

प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदेंसोबत गेलेले मुंबईतल्या आमदारांपैकी एक आहेत.

बालाजी किणीकर यांनीही सुरूवातीलाच एकनाथ शिंदेंना साथ दिली.

बालाजी कल्याणकर यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे

अनिल बाबर यांनाही अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आली आहे.

महेश शिंदेदेखील एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले होते

संजय रायमुलकर यांनाही अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आली होती.

रमेश बोरनारे हे देखील शिंदेंसोबत गेले होते

चिमणराव पाटील, या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.