पंतप्रधान मोदींचं आईसोबतचं अनोखं नातं
पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
राजकारणाव्यतिरिक्त मोदी त्यांच्या आईसोबत असलेल्या खास नात्यामुळेही चर्चेत असतात.
नरेंद्र मोदी आणि त्यांची आई हिराबेन यांच्यामध्ये अनोखं नातं आहे.
पंतप्रधानांच्या आई हीराबेन यांचे वय 100 पेक्षा जास्त आहे.
या वर्षी जूनमध्ये त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला.
हिराबेन यांच्या वाढदिवशी नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून त्यांचे आशिर्वाद घेतले.
मोदी अनेकवेळा त्यांच्या आईसोबत वेळ घालवताना दिसतात.
मोदी आणि त्यांच्या आईचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
मोदी आईसोबत मनसोक्त गप्पा मारताना दिसतात.