भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं. 

लक्ष्मण जगताप दुर्धर आजाराने त्रस्त होते.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी पीपीई कीट घालून मतदानाला हजर राहिल्याने त्यांची चर्चा झाली होती.

ते पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार होते. जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती नाजूक असताना रुग्णवाहिकेनं विधिमंडळात पोहोचले होते.

आज प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं, पण त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज दुपारी 2 ते 6 या दरम्यन त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे.

आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील विकासामध्ये लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान आहे.