राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या मुलानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एन्ट्री घेतली.

प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. 

हा विजय म्हणजे प्रतीक पाटील यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.

लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखाना स्थापनेच्या वेळी संचालक होते. 

त्यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना असे करण्यात आले. 

आमदार जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून झाला होता. 

10 वर्षे ते अध्यक्ष राहीले. तसेच आजतागायत संचालक म्हणून होते. 

येत्या काळात कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणार आहे, हे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. 

आमदार जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश करुन घेतला.

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांचा अलीकडेच शाही विवाह पार पडला होता. 

Heading 2