ठाकरेंच्या राजीनाम्यावर कांदेंचा गौप्यस्फोट
यावेळी त्यांनी सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली.
“तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या काँट्रॅक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा.
उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला.
किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्ती केलं, राजीनामा देण्यापूर्वी मी स्वतः साक्षीदार आहे.
या काँट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा”, असा खळबळजनक दावा सुहास कांदे यांनी केला आहे.
आज सभा बघून उद्धव ठाकरेंची दया आली. तिकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन करायचे इकडे त्यांचा विरोध करायचा. राहुल गांधींबद्दल दुटप्पी भूमिका घेऊ नका.
मुंबईत बाजू वेगळी घ्यायची, मालेगावमध्ये वेगळी भूमिका घ्यायची. पण ही फक्त टोमणे सभा झाली. उद्धव साहेब हिंदुत्व विसरून गेले आहेत”, अशी टीका देखील सुहास कांदे यांनी केली.