'या' महिलांनी गाजवलं मुंबईचं महापौरपद

मुंबईचे महापौरपद हे देशातील एक प्रतिष्ठित पदांपैकी एक मानलं जातं. आतापर्यंत सात महिलांनी मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली आहे. 

सुलोचना मोदी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य. त्या मुंबईच्या महिला महापौर होत्या. 1956 मध्ये त्यांनी महापौरपदाची जबाबदारी स्विकारली होती. 

काँग्रेसच्या निर्मला सामंत-प्रभावळकर या 1994 मध्ये मुंबईच्या महापौर झाल्या. त्या पेशानं वकील होत्या. 

यानंतर विशाखा राऊत यांची 1997 मध्ये मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. त्या शिवसेनेच्या पहिला महिला महापौर होत्या. 

शुभा राऊळ पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबईचे महापौर सांभाळले. 

यानंतर 2009 मध्ये श्रद्धा जाधव यांची शिवसेनेच्या महापौरपदी निवड झाली. 

यानंतर 2012 मध्ये स्नेहल आंबेकर या मुंबईच्या महापौर झाल्या. यानंतर त्या विधानसभेच्या आमदारही झाल्या होत्या.

यानंतर 2019 मध्ये किशोरी पेडणेकर यांची मुंबई मनपाच्या महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. 

परिचारिका ते महापौर असा थक्क करणारा प्रवास त्यांचा राहिला आहे.