छगन चंद्रकांत भुजबळ - भाजीविक्रेते ते मंत्रीपदाचा प्रवास
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. ते एकेकाळी भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे.
छगन VJTI कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते, पण तो त्यांनी अर्ध्यातच सोडला.
तळगाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेनेत महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले.
1985मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली.
पुढे मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळही राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर आघाडी सरकारमध्ये भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.
मार्च 2016मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. ते 26 महिने तुरुंगात होते.
त्यानंतर 2019ची विधानसभा निवडणूक लढवून भुजबळ पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री झाले.