फिफा वर्ल्डकप 2022 उद्घाटन समारंभाला फरार कट्टरपंथी झाकीर नाईक उपस्थित राहिल्याने फुटबॉल जग वादाच्या भोवऱ्यात सापडलं. 

याबाबत भारताने कतारकडे तीव्र आक्षेप नोंदवला होता. 

यावर कतारने स्पष्टीकरण देत झाकीर नाईकला उद्घाटन समारंभाला निमंत्रण दिले नसल्याचं सांगितले.

फरार झाकीर नाईकवर मनी लाँड्रिंगचा तसेच तरुणांना दहशतवादासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. 

झाकीर नाईकवरही द्वेषपूर्ण भाषण दिल्याचा आरोप आहे. 

या वर्षी मार्चमध्ये, फरार झाकीर नाईक संचालित इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला गृह मंत्रालयाने बेकायदेशीर संस्था म्हणून घोषित केले होते. 

UAPA च्या कठोर कलमांनुसार IRF वर बंदी घालण्यात आली आहे.

झाकीर नाईकने मलेशियामध्ये आश्रय घेतला आहे. 

भारताने यासंदर्भात मलेशियाला प्रत्यार्पणाची विनंतीही पाठवली आहे. 

2020 मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीतही त्याचा हात असल्याचे मानले जात आहे. 

द्वेषपूर्ण भाषणामुळे झाकीर नाईकवर ब्रिटन आणि कॅनडानेही बंदी घातली आहे.