2019 लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचं राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व समिक्षेखाली आलं.
राज्यातल्या निवडणुका तोंडावर असल्याने आयोगाने काहीच निर्णय घेतला नव्हता.
1968 च्या सिम्बॉल ऑर्डरनुसार पक्षाची राष्ट्रीय मान्याता गेली तर देशभरात एकाच चिन्हावर निवडणुका लढात येत नाहीत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीला इतर राज्यात घड्याळावर निवडणूक लढता येणार नाही.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी घड्याळावरच लढेल, कारण राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा कायम आहे.
लोकसभा निवडणुकीत 4 किंवा जास्त राज्यात 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाल्यावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
याशिवाय लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच 3 राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात.
राष्ट्रीय दर्जामुळे पक्षाला सर्व राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्यात येते.
निवडणुकांच्या वेळी राष्ट्रीय पक्षाला सरकारी चॅनलवर प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.