राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील Viral फोटो

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या सुरू आहे. 

या यात्रेतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लवकरच ही पदयात्रा महाराष्ट्रात येणार आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला यात्रा नांदेडमध्ये दाखल होणार आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वात तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा सुरू झाली. 

हा प्रवास 150 दिवस चालणार आहे. 

यावेळी ते 12 राज्यांमधून जाणार आहे. 

3,570 किमी लांबीचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. 

ही यात्रा 12 राज्यांतील 20 शहरांमधून जाणार आहे. 

कन्याकुमारी येथून सुरू झालेला प्रवास तिरुअनंतपुरम, कोची आणि केरळमधील निलांबूरपर्यंत गेला.

यानंतर ते कर्नाटकातील म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, तेलंगणातील विकाराबादमधून महाराष्ट्रात प्रवेश होईल. 

महाराष्ट्रात नांदेड, जळगाव जामोदनंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोहोचेल. 

येथून प्रवास जम्मूमार्गे कोटा, दौसा, राजस्थानमधील अलवरपर्यंत जाईल. 

पुढे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये प्रवेश होईल. 

त्यानंतर दिल्ली, हरियाणातील अंबाला, पंजाबमधील पठाणकोटमार्गे श्रीनगरला पोहोचेल. 

येथे यात्रेचा समारोप होईल.

या यात्रेत सर्वच स्तरातील लोक सहभागी होताना दिसत आहेत.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनीही या यात्रेत हजेरी लावली.

यातील काही फोटो इंटरनेटवर काही वेळात व्हायरल झालेत.

हा फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

अभिनेत्री आणि दिग्दर्शक पुजा भट्ट देखील यात्रेत सहभागी झाल्या.

या यात्रेतून काँग्रेसला किती फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल.