धंगेकर विजयी; कसब्यात भाजपचं काय चुकलं?

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले होते.

कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. 

बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.

त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं.

शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहे.

आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी 100 टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे, असेही रवींद्र धगेकर म्हणाले. 

दरम्यान, कसब्यातील पोटनिवडणूकीत रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवल्यावर भाजपचं नेमकं कुठे चुकलं, याबाबतचं चिंतन त्यांना करावं लागणार आहे.