एकनाथ शिंदेंनी काढलं ट्रमकार्ड

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाची युती होणार असल्याची चर्चा आहे. 

दुसरीकडे मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युतीची घोषणा केली आहे. 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. 

या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युतीची घोषणा करण्यात आली. 

या पत्रकार परिषदेमध्ये  जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं. 

शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले. या धडाकेबाज निर्णयानं प्रभावीत होऊनच आपण ठरवलं युती करायची तर ती फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेशीच असं कवाडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जोगेंद्र कवाडे यांचं कौतुक केलं आहे. कवाडे यांच्यासोबत पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. 

आम्ही दोघेही संघर्षातून पुढे आलो आहोत. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, राज्याच्या हितासाठी एकत्र येत आहोत असं  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

कवाडेंच्या पक्षाशी युती करुन एकनाश शिंदे यांनी ट्रमकार्ड काढले आहे.