राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

भाजपने राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. 

तर राष्ट्रवादीने हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. 

शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.

एकंदरीत भाजप-शिंदे युतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.

भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. 

तर महाविकास आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.

तसेच इतर आघाड्यांनी अकराशेहून अधिक ठिकाणी सत्ता मिळवली आहे. 

राज्यातील 616 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.