केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवलं आहे.
20 जून: शिवसेना नेते एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली.
21 जून: एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 35 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला.
22 जून: शिंदे 40 आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले.
23 जून: एकनाथ शिंदे आणि 37 आमदारांनी शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषणा केली.
24 जून: शिवसेनेची विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी.
26 जून: उपाध्यक्षविरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याप्रकरणी शिंदेंची सर्वोच्च न्यायालयात धाव.
29 जून: फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन फ्लोअर टेस्टची मागणी केली.
29 जून: उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा.
30 जून: एकनाथ शिंदे यांची नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ. तर फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी.
5 ऑक्टोबरला शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे.
9 ऑक्टोबर : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि नाव तात्पपुरतं गोठवलं.