काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील आजचा शेवटचा दिवस आहे. 

भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. 

भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन मध्य प्रदेशमध्ये पोहोचली.

भारत जोडो यात्रा हिंगोलीत असताना या यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी सेनेचे इतर नेतेही होते.

राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे याही राहुल गांधींसोबत नांदेडमध्ये यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी पक्षाचे इतर नेतेही होते.

आमदार रोहित पवार हे देखील राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले.

राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला. 

यात्रेदरम्यान 17 नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचे वाचन केले.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची शेगावमध्ये सभा झाली. ही सभा आतापर्यंतची सर्वात मोठी मानली जाते.

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 19 नोव्हेंबरला यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी झाली.

अभिनेते अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी जळगाव जामोदपासून भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.