ठाकरेंची तिसरी पिढी, राजकारण ते कला कोण काय करतंय?

बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी मीनाताई यांना बिंदू माधव, जयदेव आणि उद्धव अशी तीन मुले आहेत. 

यातील बिंदू माधव यांना 20 एप्रिल 1996 रोजी वयाच्या 42 व्या वर्षी लोणावळेहून मुंबईला परतत असताना कार अपघातात निधन झालं. 

त्यांच्या दोन मुलांपैकी मुलगा निहार हा व्यवसायाने वकील आहे.

तर मुलगी नेहा ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करतात.

उद्धव यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी तीन लग्न केली. 

जयदेव यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा जयदीप कला दिग्दर्शक आहेत.

दुसऱ्या पत्नीपासून जन्मलेली राहुल आणि ऐश्वर्य ही दोन मुले चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.

तिसऱ्या पत्नीपासून झालेली माधुरी ठाकरे फार चर्चेत नसतात.

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी आदित्य ठाकरे राजकारणात आहेत.

उद्धव यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे हे वन्यजीव संशोधक आहेत.

राज ठाकरे यांना अमित आणि उर्वशी अशी दोन मुलं आहेत. यापैकी अमित राजकारणात सक्रीय आहेत.

उर्वशी ठाकरे ह्या राजकाणापासूनच सध्यातरी दूरच आहेत.