Inspiring Story : 8 वी पास उमेदवार कसब्याचा आमदार!
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे.
धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
धंगेकर नेहमी दुचाकीवर प्रवास करतात. ते कधीही चारचाकीमध्ये दिसत नाही.
मी आजपर्यंत चित्रपटगृहात गेलेलो नाही. अनेक मित्र सिनेमाची तिकीटे आणून देतात पण मी जात नाही. असे ते म्हणतात..
रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली.
धंगेकर हे तब्बल 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे.
आता आठवी पास उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसणार आहेत.
रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने राजकारणात शिक्षणासोबतच जर जनतेची कामं केली, तर लोक तुम्हाला स्विकारतात.
आठवी पास असलेल्या रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने हे सिद्ध केले आहे.