15व्या गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका पार पडली.

इतिहास पाहिला तर 1962 ते 1990 या काळात काँग्रेसला 50 टक्के मते मिळाली.

भाजपने गुजरातमध्ये 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. 

तर 2017 मध्ये भाजप फक्त 99 जागा जिंकू शकली तर काँग्रेसच्या जागा 2002 मधील 51 वरून 77 झाल्या.

गुजरातमध्ये 1990 नंतर जनता दल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर काँग्रेस पक्षाची वाईट अवस्था सुरू झाली.

1990 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा काँग्रेसची मतांची टक्केवारी केवळ 38 टक्के होती.

यानंतर पुढच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आणखी घसरली. 

त्यानंतर 27 वर्षांपासून काँग्रेस गुजरातमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपला 49 टक्के मते मिळाली होती. भाजपचा हा ट्रेंड 2017 पर्यंत कायम होता.

आता गुजरात विधानसभेत 2022 मध्ये कोणत्या पक्षाला किती मताधिक्य मिळते यावर बरेच काही अवलंबून असेल.