बारसू रिफायनरीवरून वातावरण चांगलचं तापलं आहे.
बारसू रिफायनरीला स्थानिकांकडून विरोध होत आहे.
स्थानिकांच्या विरोधामुळे राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे.
विरोध असूनही प्रकल्पाच्या जागेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्यानं प्रशासन आणि ग्रामस्थांमधील संघर्ष वाढला आहे.
तिथे हा प्रकल्प झाल्यास पांरपरीक व्यावसाय असलेला मासेमारी आणि आंब्यांच्या बागा संकटात येथील अशी भीती येथील स्थानिकांना वाटत आहे.
तसेच या प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात प्रदूष होईल असंही येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे, यातून या प्रकल्पाला विरोध केला जात आहे.
दुसरीकडे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नसून, विरोधकांकडून मुद्दाम राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
सध्या बारसू प्रकल्पावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही.
बारसूवर अद्यापही तोडगा निघत नसल्यानं तेथील स्थानिक लोक मात्र अस्वस्थ आहेत. बारसूवर तोडगा कधी निघणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.