मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्यातून काय साधलं? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्येमध्ये भव्य शक्तिप्रदर्शन करत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.

 शिंदेंनी अयोध्येत केलेल्या जोरदार शक्तिप्रदर्शनानंतर या दौऱ्यातून काय साध्य झालं? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा होता.

 अयोध्यातील साधू, सतांनी मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाण दिलं, आता हे धनुष्यबाण बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर नेलं जाणार आहे.

 राजकीयदृष्या या दौऱ्यातून आपल्या चिन्हाचा राज्यभर प्रचार करण्याची संधी मुख्यमंत्र्यांना मिळाली.

या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत हजारो शिवसैनिक अयोध्येला आले आहेत, या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं

सध्या शिंदे गटाकडून वारंवार ठाकरे गटावर हिंदुत्त्वावरून आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.

निवडणुकांपूर्वी एक प्रखर हिंदुत्त्ववादी चेहरा म्हणून पुढे येण्यास मुख्यमंत्र्यांना या दौऱ्यामुळे मदत होऊ शकते.

मविआच्या काळात शिवसेनेच्या काही आमदारांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता , यानिमित्ताने त्यांची नाराजी दूर झाली आहे.