सत्तासंघर्षाच्या निकालानंतर 3 पर्याय 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या सत्तासंर्घषाची लढाई सुरू होती.

आता कोणत्याही क्षणी राज्याच्या सत्तासंर्घषाचा निकाल हाती येऊ शकतो.

सत्तासंर्घषाचा निकाल काहीही लागला तरी सध्या तीनच पर्याय समोर असल्याचं दिसतं.

एक म्हणजे निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागला तर ते मुख्यमंत्रीपदी कायम राहणार .

 दुसरा पर्याय म्हणजे जयंत पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे जर निकाल विरोधात गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.

तिसरा पर्याय म्हणजे राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी भाजपचा एखादा नेता मुख्यमंत्री होऊ शकतो.

वरील तीन पर्याय पहाता राष्ट्रपती राजवटीची शक्यता ही खूप कमी आहे. 

 एक तर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी राहणार किंवा भाजपचा नेता मुख्यमंत्री बनवू शकतो.

राष्ट्रवादीही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकते अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.