आठवड्यातील 10 मोठ्या राजकीय घडामोडी
आठवड्याच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर होते.
दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी दिल्ली मार्गे अयोध्येला पोहोचले.
शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य केलं, या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलं.
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर काही काळ अजित पवार नॉटरिचेबल होते. ते दुसऱ्या दिवशी पुण्यात परतले.
दरम्यान अजित पवार नॉटरिचेबल झाल्यानंतर ते भाजपासोबत जाणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या.
याचदरम्यान अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं ईडीच्या आरोपपत्रातून नाव वगळण्यात आलं.
महाविकासआघाडीतले मतभेद समोर येत असतानाच उद्धव ठाकरे मंगळवारी शरद पवारांना भेटले.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सप्ताहानिमित्त एकाच आठवड्यात दोनदा एकाच व्यासपीठावर आले.
त्यानंतर जीएसटी थकवल्याच्या प्रकरणात जीएसटी पथकाकडून पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला.
हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे.