पवारांची गुगली 'मविआ' क्लीन बोल्ड
सध्या जेपीसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.
मोदी यांची पदवी आणि अदानी प्रकरणात जेपीसी या दोन मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून भाजपच्या कोंडीचा प्रयत्न होतोय
मात्र या दोन्ही प्रकरणात शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तर पदवी या विषयावर कधीही बोलता येऊ शकते, सध्या राज्यापुढे अनेक महत्त्वाचे विषय आहे म्हणत त्यांनी ठाकरे गटालाही फटकारलं आहे.
शरद पवारांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आरोपांमधील हवाच निघून गेली आहे.
मात्र दुसरीकडे शरद पवारांची ती वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हणत काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून सारवासारव करण्यात येत आहे.
शरद पवारांच्या या वक्तव्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा होताना दिसत आहे.
मात्र जरी असं असलं तरी देखील महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचं तीनही घटक पक्षांकडून दावा केला जात आहे.