भाजप कसब्याची पुनरावृत्ती टाळणार? 

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. 

या मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. 

पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्वरदा बापट, मुरलीधर मोहळ आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे

मात्र गेल्या वेळी कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेत पक्षाकडून प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलं जात आहे. 

काँग्रेसकडून पोटनिवडणुकीसाठी रवीद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांचं नाव चर्चेत आहे

मात्र भाजप कोणाला उमेदवारी देणार यावरच मविआचा उमेदवार ठरण्याची अधिक शक्यता आहे. 

त्यामुळे यावेळी भाजपकडून उमेदवाराची निवड ही अत्यंत विचारपूर्वक केली जाण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे कसब्यात मिळालेल्या विजयामुळे मविआचा आत्मविश्वास वाढला असून, त्याचा फायदा आघाडीला होण्याची शक्यता आहे. 

भाजप आणि मविआकडून अद्याप उमेदवार जरी निश्चित झाले नसले तरी देखील या निवडणुकीत काटे की टक्के पहायला मिळणार एवढं नक्की