सत्तेची सुत्रे पुन्हा 'मातोश्री'तून हलणार? 

 बाळासाहेबांच्या काळात राज्यातील सत्तेची सुत्रं मातोश्रीमधूनच हालत होती 

भाजप शिवसेना युतीमध्ये भाजपचे बडे नेते बाळासाहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येत असत

बाळासाहेबांनंतर शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही बनले. 

मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. ठाकरेंच्या हातातून पक्षाचं नाव आणि चिन्हही गेलं

या धक्क्यातून आता ठाकरे गट सावरताना दिसत आहे. 

 मविआकडून देखील नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनाच प्रमोट केलं जात आहे. 

दुसरीकडे विरोधी पक्षातील बडे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी उत्सुक आहेत. 

 काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता नितीश कुमार देखील त्यांची भेट घेणार आहेत. 

राहुल गांधी देखील मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा सुरू होती. 

 त्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांनंतर सत्तेची सुत्रे मातोश्रीतून हलणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.