प्रेमसंबंधामुळे चर्चेत आलेले मंत्री

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे आपल्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आले होते, त्यांनी कन्नड अभिनेत्री राधिकासोबत लग्न केले.

कुमारस्वामी आणि राधिका या दोघांचेही हे दुसरे लग्न होते, कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी राधिका ही त्यांच्यापेक्षा तब्बल 27 वर्षांनी लहान आहे.

 कुमारस्वामी आणि राधिकाची ओळख प्रथम 2005 मध्ये झाली होती, त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले

2010 मध्ये कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी राधिकानेच आपण एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. 

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन हे देखील आपल्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आले होते

चंद्रमोहन यांचं पहिलं लग्न झालं होतं, हिंदू कायद्यानुसार दुसऱ्या लग्नाला परवानगी नसल्यानं त्यांनी धर्म बदला. 

चंद्रमोहन यांनी मुस्लीम धर्म स्विकार करून माजी अतिरिक्त महाधिवक्ता अनुराधा बाली यांच्यासोबत विवाह केला

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील प्रेमसंबधामुळे चांगलेच चर्चेत आले होते. 

त्यांनी करुणा शर्मांसोबत प्रेमसंबंध असल्याचीही कबुली दिली होती. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.