फोडाफोडीचं राजकारण पार्ट 2?
सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली.
उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता, यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली.
एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपद मिळवलं.
शिंदे यांच्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील गेलं.
महाविकास आघाडी या सर्वांमधून सावरत असताना आता पुन्हा दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांची चर्चा सुरू असल्यानं राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.
समोर येत असलेल्या माहितीनुसार भाजपकडून देखील अजित पवार यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळत आहे.
आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये देखील अशीच फूट पडणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणा आहे.