महाविकास आघाडीचे मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत
सामनामधून शरद पवारांवर जोरदार टीका करण्यात आली होती.
या टीकेचा शरद पवारांकडून समचार घेण्यात आला, त्यांनी राऊतांना चांगलंच सुनावलं
दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता.
या आरोपाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांचं काँग्रेसमधील स्थान काय आहे? असा सवाल शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांच्या या टीकेला नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिलं. चव्हणा यांना काँग्रेसमध्ये टॉपचं स्थान असल्याचं त्यांनी म्हटलं
मध्यंतरी अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये देखील चांगलीच जुंपली होती. राऊत यांनी वकिली करू नये असं पवार यांनी म्हटलं होतं
आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नसल्याचा टोला पटोले यांनी लगावला होता, तर भुजबळांनीही ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडावं का असा सावाल भुजबळ यांनी केला आहे.