राजकीय नेत्यांना कोण धमकावतंय?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
लॉरेन बिश्नोई गँगने संजय राऊत यांना धमकी दिल्याचा दावा करण्यता येत आहे.
राऊत यांना आलेल्या धमकीनंतर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना आलेल्या धमक्यांचा विषय चर्चेत आला आहे.
चार दिवसांपूर्वीच फडणवीसांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन नागपूर पोलिसांना आला होता.
या फोननंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली, धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.
नितीन गडकरींना देखील धमकीचा फोन आला आहे. गडकरींच्या संपर्क कार्यालयात फोन करून खंडणीची मागणी करण्यात आली.
दहा कोटींची खंडणी दिली नाही तर जीवे मारू, अशी धमकी गडकरी यांना देण्यात आली होती.
गडकरींना जयेश पुजारी नावाने धमकीचा फोन आला होता, नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी पुजारीला ताब्यात घेतलं आहे.
यापूर्वी देखील नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला आहे. तो देखील पुजारीच्याच नावाने आला होता.