मविआमध्ये काँग्रेसचं वजन वाढलं!
कर्नाटकमध्ये काँग्रेसनं भाजपला धूळ चारत दणदणित विजय मिळवला
कर्नाकमध्ये काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली आहे.
या निवडणुकीतील विजयाचा फायदा आता काँग्रेसला महाराष्ट्रात देखील होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मविआत धूसपूस सुरू असल्याचं दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
अद्याप महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली नसल्याचं प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
मात्र जागावाटपावरून नाराजीनाट्य उद्धभवल्यास काँग्रेसला कर्नाटक विजयाचा फायदा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याची संधी या निमित्तानं निर्माण झाली आहे.