निवडणुकीपूर्वी 'मविआ'त बिघाडी? 

महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे.

मात्र मविआतील अंतर्गत वाद आणि परस्परविरोधी भूमिका वारंवार समोर येताना दिसत आहेत

अदानी प्रकरणात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जेपीसी स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती. 

 मात्र शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. पवारांचं हे वक्तव्य काँग्रेससाठी धक्का मानलं जात आहे. 

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मविआच्या नेत्यांकडून सारवासारव केली जात आहे. 

पवाराच्या भूमिकेत नवे काही नाही, त्यांनी फक्त जेपीसीला पर्याय दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

 दुसरीकडे सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. 

काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे सावरकरांवरून ठाकरे गटाने अनेकदा काँग्रेसला इशारा दिला आहे. 

थोडक्यात वरून जरी सर्व अलबेल वाटत असले तरी हे मतभेत निवडणुकीच्या तोंडावर मविआसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.