अजितदादांवर भरवसा नाय का?
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांचा सासवड दौरा रद्द आणि बावनकुळेंची दिल्लीवारी यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं
मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शेवटपर्यंत राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा करण्यात येत होता
अखेर मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली
आपण राष्ट्रवादीसोबतच आहोत, बातम्या मुद्दामहून पेरल्या जात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं
मात्र त्यापूर्वी अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याची आणि त्यांना 40 आमदारांचं समर्थन असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या
तरी देखील शरद पवार आपल्या दाव्यावर ठाम होते, राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
अखेर जे आमदार अजित पवारांसोबत जाणार आहेत, अशी चर्चा सुरू होती त्या सर्व आमदारांशी शरद पवार यांनी पुन्हा एकदा संपर्क केला.
त्यानंतर राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नसून, सर्व आमदार माझ्या संपर्कात असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं