'फडतूस' राजकारण 

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर ठाण्यात हल्ला करण्यात आला होता, यावरून चांगलच राजकारण रंगलं

उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. 

राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला होता. 

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर भाजपचे नेते चांगलेच आक्रम झाले. 

 उद्धव ठाकरेंच्या फडतूस गृहमंत्री या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

खरा लाचार आणि फडतूस कोण आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित असल्याचा पलटवार फडणविसांनी केला. 

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावरून बावनकुळे यांनी दिला होता.

दरम्यान यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला

देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का, नाव सोडलं तर तुमच्याकडे दुसरं काहीही नसल्याचा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.