राहुल गांधींना
कोणतं वक्तव्य भोवलं?
सूरतमधील न्यायालयाने पंतप्रधान मोदींच्या अवमानप्रकरणी राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा सुनावलीय.
शिक्षा सुनावल्याने राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचं लोकसभा सचिवालयाने म्हटलंय.
२०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
कर्नाटकात १३ एप्रिल २०१९ रोजी घेतलेल्या प्रचार सभेत राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता.
नीरव मोदी ज्याने भारतात सर्वात मोठी चोरी केली त्याचं आडवान तेच आहे जे पंतप्रधान मोदींचं आहे असं राहुल गांधी म्हणाले होते.
क्रिकेटमधील भ्रष्ट व्यक्ती ललीत मोदी याचेही आडनाव मोदी असल्याचं राहुल गांधी बोलले होते.
हे सांगत असताना राहुल गांधी असेही म्हणाले होते की, सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसं असतं?
राहुल गांधी यांना वरच्या कोर्टात जाण्यासाठी मुदत देण्यात आली असून ३० दिवसांसाठी त्यांची शिक्षा स्थगित करत जामीन देण्यात आला आहे.