डेबिट कार्ड वापरताना करु नका ही चूक
तुमचं बँक अकाउंट असेल तर डेबिट कार्ड नक्कीच असेल.
डेबिट कार्ड वापरताना एकही चूक तुम्हाला मोठं नुकसान पोहोचवू शकते.
डेबिट कार्डच्या मागील बाजूस तीन अंकी CVV क्रमांक लिहिलेला असतो.
RBI नुसार कार्ड मिळातच, यूझर्सने प्रथम त्यांचा CVV क्रमांक लक्षात ठेवावा किंवा तो सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवावा.
यानंतर कार्डवरुन CVV क्रमांक मिटवावा.
असं केल्याने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून मोठ्या प्रमाणात वाचवू शकता.
कार्डद्वारे पेमेंट करता तेव्हा तुम्हाला CVV नंबर टाकावा लागतो.
हा CVV नंबर मिटवला, तर कार्ड हरवलं तरीही दुसरी व्यक्ती CVV शिवाय व्यवहार करू शकणार नाही.
CVV नंबर चुकीच्या हातात पडला तर तुमचं अकाउंट रिकामं होऊ शकतं.