बँका का मागतात कॅन्सल चेक? कुठे होतो वापर?

डिजिटल आणि नेट बँकिंगच्या काळात कन्सल चेकची परंपरा सुरुच आहे. आजही बँक किंवा विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना कॅन्सल चेक मागतता. 

तुम्ही बँक किंवा इतर ठिकाणी कॅन्सल चेक देता त्यावर साइन करण्याची गरज नसते. फक्त चेकवर CANCELLED लिहावं लागतं. 

यासोबतच चेकवर क्रॉसचं साइनही टाकावं लागतं. कंपन्या किंवा बँक कॅन्सल चेक ग्राहकांचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी घेतात.

सामान्यतः कॅन्सल चेक देण्याचा अर्थ असा असतो की, बँकमध्ये तुमचं अकाउंट उपलब्ध आहे. चेकवर तुमचा बँक अकाउंट नंबर लिहिलेला असतो. 

कॅन्सल चेकने कोणीही तुमच्या अकाउंटमधून पैसे काढू शकत नाही. याचा वापर केवळ तुमचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी केला जातो. 

ज्यावेळी कोणालाही कॅन्सल चेक दिला जातो. तर मधोमध CANCELLED लिहिलं जातं. जेणेकरुन त्याचा कोणी वापर करु नये. 

ज्यावेळी तुम्ही फायनेंशियल काम करतात, तेव्हा कॅन्सल चेकची गरज पडते. तुम्ही लोन घेण्यासाठी गेला तर बँक कॅन्सल चेक मागतात. 

कॅन्सल चेकसाठी नेहमी ब्लॅक इंक किंवा ब्लू इंकचा पेन वापरावा. PF मधून ऑनलाइन पैसे काढण्यासाठीही कॅन्सल चेकची गरज पडते. 

कॅन्सल चेकवरही तुमच्या अकाउंटसंबंधित सर्व डिटेल्स लिहिलेले असतात. यामुळे हे कोणालाही देऊ नका. 

येथे तुमच्या पैशांवर मिळतं 86 टक्के व्याज 

Click Here