महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : शेतकऱ्यांसाठी काय?
आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करत आहेत.
फडणवीसांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय?
प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार
1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार, असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.