फाटकी नोट कशी बदलावी, हे आहेत नियम

आणखी पाहा...!

फाटकी नोट जवळ असल्यावर ती कशी बदलावी असा प्रश्न पडतो.

एटीएममधून पैसे काढताना अनेकदा फाटलेल्या नोटा निघतात.

तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा असतील तर त्या सहज बँकेत जाऊन बदलता येऊ शकता.

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँक कोणतेच चार्ज घेत नाही.

RBI ने एटीएममधून फाटलेली नोट बदलण्यासाठी नियम बनवले आहेत. 

फाटलेली नोट तुम्ही सहज कोणत्याही बँक ब्रांच किंवा रिझर्व्ह बँक कार्यालयातून बदलू शकता.

RBI नुसार एकूण 5000 रुपये मूल्याच्या फाटलेल्या नोटाच एका वेळी बदलल्या जाऊ शकतात.

खूप जास्त खराब झालेल्या आणि तुकडे झालेल्या नोटा बदलता येत नाहीत.

अशा प्रकारच्या नोटा रिझर्व्ह बँकच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात.