Heading 3
टायर फुटून गाड्यांचा अपघात होण्याचं प्रमाण सध्या वाढलंय. यामुळेच टायरची काळजी कशी घ्यायची हे आपण जाणून घेऊया.
तुमच्या कारच्या टायरची कंडीशन चांगली असेल तर त्याचा परफॉर्मेंसही चांगला असतो.
वेळेबरोबर टायर खराब होतात आणि घासतात. यामुळे गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो.
या दरम्यान ते बदलावे लागतात. तुम्ही वेळेवर बदलले नाही तर तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकतं.
यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होईल. यासोबतच तुमच्यासमोर दुर्घटनेसारखी स्थिती उत्पन्न होऊ शकते.
देशात टायर फुटल्यामुळे अनेक दुर्घटना होतात. अनेक कारणांमुळे कारचं टायर फुटतं.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही अशी परिस्थिती येऊ शकते.
टायर जुनं झालं असेल तर टोकदार दगडामुळेही फुटू शकतं.
ड्रायव्हिंग करताना रस्ता आणि टायरमध्ये घर्षण होते. यामुळे तापमान निर्माण होते आणि टायर फुटण्याची शक्यता असते.
जास्त वेगाने गाडी चालवत असाल तर टायर ती गती झेलण्यास सक्षम नसते. यामुळे टायर फुटू शकतं.
ट्रेनच्या चाकाचं वजन किती?
Click Here