या लोकांना मिळत नाही PM Awas Yojana चा लाभ!

देशातील गरीब नागरिकांचे स्वप्नातील घर पूर्णकरण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना चालवली जाते. 

पीएम आवास योजनेअंतर्गत मैदानी परिसरात घर बांधण्यासाठी एक लाख 20 हजार, तर पहाडी भागात घर बांधण्यासाठी एक लाख 30 हजार रु. मिळतात. 

या योजनेसाठी सरकारने पात्रता तयार केलीये. म्हणजेच सर्वच लोक या स्कीमचा लाभ घेऊ शकत नाही. 

ज्या लोकांचं पक्क घर नाही, त्यांनाच पूर्ण चौकशी केल्यानंतर हा लाभ मिळतो. 

ज्या लोकांकडे दुचाकी किंवा तिचाकी वाहन असेल त्यांना लाभ मिळत नाही. 

फ्रिज, लँडलाइन कनेक्शन किंवा अडीच एकरापेक्षा जास्त शेती असेल तर लाभ मिळत नाही. 

यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकता. यानंतर लिस्टमध्ये नावं येतं. 

कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरी करत असल्यास योजनेचा लाभ मिळत नाही. 

सरकारने पीएम आवास योजनेसाठी वाटप 66% वाढवून 79,000 कोटी रु. केलंय. आतापर्यंत 1.20 कोटीपेक्षा अधिक घर वाटप झालंय.