मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टोल रेट महागणार!

मुंबईपासून पुण्याचा प्रवास करणं आता महागणार आहे. 

1 एप्रिलपासून या एक्सप्रेसवेवरुन जाण्यासाठी तुम्हाला जास्त टोल टॅक्स द्यावा लागेल.

पुढच्या महिन्यापासून टोल दरांमध्ये 18 टक्के वाढ होणार आहे. 

खासगी वाहन चालकांना 320 रु. भरावे लागणार आहेत.

कार चालकांना 360 रु. टोल द्यावा लागेल. 

टेंपोचा टोल 420 रु. ने वाढून 495 होईल. 

ट्रकचे 580 ऐवजी 685 रुपये करण्यात आलेय. 

बससाठी आता 797 ऐवजी 940 रुपये टोल द्यावा लागेल. 

या रुटवर टॅक्स आणि बसच्या भाड्यामध्येही वाढ होऊ शकते. यामुळे हा प्रवास आता महागणार आहे.