गुळाची मागणी बाजारात वाढली असल्याने दर देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.
घरगुती ग्राहकांसह मिठाई विक्रेते, कारखानदार, लघुउद्योगांकडून गुळाला चांगली मागणी आहे.
दर्जेदार उसापासून चिक्की गूळ बनविला जातो तो वर्षभरातून एकदाच तयार केला जातो.
गुळामध्ये मऊ, चिकट व घट्टपणा जास्त असतो. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अधिक वापर होतो.
चिक्की गूळ शेंगदाणा, तीळ पदार्थांना घट्ट धरून ठेवतो. तो खायला अधिक गोड असल्याने पोळी, लाडू, चिक्की, करण्यासाठी वापरला जातो.
बाजारात चिक्की गुळाची मागणी वाढली असल्याने 4 हजार 770 रुपये इतका उच्चांकी दर सांगली मार्केटमध्ये मिळत आहे.