रेल्वे ट्रॅकवर अनेक अशा ट्रेन आहेत, ज्यांना सर्वात अस्वच्छ असल्याचा किताब मिळाला आहे.
प्रवाशांनी रेल मदत अॅपवर केलेल्या तक्रारीनंतर हे आकडे समोर आलेय, यामध्ये सर्वात अस्वच्छ ट्रेनची यादीही आहे.
या अॅपवर आलेल्या तक्रारींनुसार सहरसा-अमृतसर एक्सप्रेस टेन देशातील सर्वात अस्वच्छ ट्रेन आहे.
या ट्रेनच्या कोचपासून ते सिंक आणि टॉयलेट केबिनपर्यंत अस्वच्छता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
अस्वच्छ ट्रेनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जोगबनी-आनंद विहार सीमांचल एक्सप्रेस आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर वैष्णो देवी-बांद्रा स्वराज एक्सप्रेस अप आणि डाउन ट्रेन आहे.
पाचव्या नंबरवर फिरोजपूर-अगरतला त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस, सहाव्या नं.वर आनंद-विहार-जोगबनी सीमांचल एक्सप्रेस आहे.
सातव्या नंबरवर अजमेर-जम्मू तवी पूजा एक्सप्रेस, आठव्या नंबरवर अमृतसर क्लोन स्पेशल ट्रेन आहे.
9 आणि 10 नंबरवर नवी दिल्ली-डब्रूगढ राजधानी एक्सप्रेस अप-डाउन ट्रेन आहे.