रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये करु नका ही कामं
भारतीय रेल्वेमधून कोट्यवधी प्रवाशी प्रवास करतात.
रेल्वेमधून प्रवास करताना काही नियम पाळणं गरजेचं असतं.
रेल्वेचे नियम मोडल्यास शिक्षा होऊ शकते.
10 नंतर लाईट चालू ठेवू नका, बंद करा. इतर प्रवाशांनी तक्रार केल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
ग्रुपने प्रवास करत असाल तर तुम्ही रात्री 10 नंतर मोठ्याने गप्पा मारु शकत नाही.
मधल्या बर्थच्या सह-प्रवाशाने त्यांची सीट उघडल्यास लोअर-बर्थचे प्रवासी काहीही बोलू शकत नाहीत.
रात्री 10 नंतर रेल्वे सेवांमध्ये ऑनलाइन जेवण देऊ शकत नाही.
तुम्ही तुमचे जेवण किंवा नाश्ता रात्रीच्या वेळीही ई-कॅटरिंग सेवांसह ट्रेनमध्ये प्री-ऑर्डर करू शकता.
रात्री 10 नंतर TTE तुमचं तिकीट चेक करायला येऊ शकत नाही.