तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता? काय आहेत नियम?

प्रत्येक महिलेला सोनं खरेदी करायची हौस असते. 

आपल्याजवळ खूप दागिने असावेत असं अनेकांना वाटतं असतं. 

मात्र तुम्ही घरात कायदेशीरित्या किती सोनं ठेवू शकता याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

CBDT नुसार छाप्या दरम्यान एका मर्यादेनंतर गोल्ड जप्त केलं जाऊ शकत नाही. 

विवाहित महिलांजवळील 500 ग्रामपर्यंतची गोल्ड ज्वेलरी जप्त केली जाऊ शकत नाही. 

अविवाहित महिलेजवळील 250 ग्रामपर्यंतची ज्वेलरी जप्त केली जाणार नाही. 

विवाहित किंवा अविवाहित पुरुषाची 100 ग्रामपर्यंतची गोल्ड ज्वेलरी जप्त केली जाऊ शकत नाही. 

कोणतीही व्यक्ती किंवा कुटुंब स्वतःजवळ कितीही सोनं ठेवू शकतो.

सध्या तरी सोनं ठेवण्याची कोणतीही मर्यादा सरकारने तयार केलेली नाही.