अनेकदा लोक तक्रार करतात की, त्याचं हेल्थ इन्शुरन्स संबंधी क्लेम विनाकारण रद्द झालं आहे.
क्लेम रद्द होण्याचे काहीना काही कारणं असतात. याची कारणं कोणती पाहूया.
हेल्थ इन्शुरन्स टाइम बाउंड कॉन्ट्रॅक्ट असतात. यामुळे पॉलिसी क्लेम मिळवण्यासाठी त्यांना दरवर्षी रिन्यू करणं गरजेचं आहे.
पॉलिसी धारक अनेकदा उपलब्ध आजारांची माहिती देत नाहीत. तपासात याची माहिती न मिळाल्यास क्लेम मिळत नाही.
वेटिंग पीरियड पॉलिसीमध्ये काही खास आजार किंवा स्थितीसाठी पॉलिसीधारक क्लेम करु शकत नाही.
पॉलिसी घेताना लक्षात ठेवा की, त्यामध्ये कोण-कोणते आजार कव्हर आहेत. पॉलिसीच्या बाहेरच्या आजारांचं क्लेम मिळत नाही.
इन्शुरन्स कंपन्या 60-90 दिवसांच्या आत पॉलिसी क्लेम करण्याची परवानगी देतात. यानंतर क्लेम रद्द होऊ शकतं.
कधी-कधी क्लेम चुकीच्या कागदपत्रांमुळेही रद्द होऊ शकतं. यासाठी पॉलिसीशीसंबंधीत मूळ दस्तावेज सांभाळून ठेवा.
उपचारांनंतर सहज क्लेम सेटलमेंट मिळवण्यासाठी नेटवर्क हॉस्पिटलची निवड करणं चांगलं असतं.
या 5 बँकांनी मे महिन्यात FD वर वाढवलं व्याज
Click Here