ऑनलाईन शॉपिंगवेळी फसवणूक झाल्यास अशी करा तक्रार

अलीकडच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करण्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. 

Amazon, Flipkart, Myntra, Jio Mart इत्यादी अनेक कंपन्या भारतात कार्यरत आहेत.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट्समुळं लोकांना घरबसल्या खरेदी करता येऊ लागली आहे. 

पंरतु अनेकदा ग्राहकांची फसवणूक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. 

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली तर तक्रार कुठं करायची? हे आपण पाहणार आहोत.  

भारत सरकारच्या ग्राहक विभागानं याबाबत काही नियम केले आहेत. 

ई-कॉमर्स वेबसाइटशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल ग्राहक तक्रार करू शकतो. हा त्याचा हक्क आहे. 

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने ग्राहकांच्या तक्रारीला 48 तासांच्या आत उत्तर द्यावं लागतं.

ग्राहकाच्या तक्रारीनंतर कंपनीला एक महिन्याच्या आत त्या तक्रारीचं निवारण करणं बंधनकारक आहे.

ग्राहक कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल, SMS किंवा वेबसाइटद्वारे तक्रारी नोंदवू शकतात. 

तक्रारीवर कारवाई न केल्यास http://e-Daakhil.nic.in वर कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवू शकतो.